दिल्लीच्या कर्तव्यपथावर 'साडे तीन शक्तीपीठ' चा देखावा झळकणार...

Update: 2023-01-25 10:32 GMT

गुरुवारी प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर देशातील विविध देखावे झळकणार आहेत. यामध्ये यावर्षी महाराष्ट्रातून 'साडे तीन शक्तीपीठ' चा देखावा सादर केला जाणार आहे. यवतमाळच्या पाटणबोरीत या देखाव्यातील शिल्पे तयार करण्यात आली आहेत.

कोरोना काळामध्ये २६ जानेवारी राजधानीतमध्ये होणाऱ्या परेडमध्ये खंड पडला होता. मात्र आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी देशभरातून येणाऱ्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे. महाराष्ट्राने यावर्षी 'साडे तीन शक्तीपीठ' आणि नारी शक्तीच्या थीम चलचित्र देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे या चलचित्र देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील यशवंत येनगूटीवार यांनी तयार केले आहेत. त्यामूळे आता पाटणबोरीचे नाव राजधानी दिल्लात चित्ररथाच्या रुपाने घेतले जाणार आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहुर व वणी येथील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन चित्ररथाद्वारे पथसंचलनात होणार आहे. सर्व शिल्प केळापूर तालुक्यात असलेल्या पाटणबोरी येथील यशवंत येनगूटीवार या शिल्पकाराने साकारली आहे. यशवंत यांना पिढीजात मूर्ती कलेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्र नव्हे तर देशाबाहेर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया दुबई तसेच श्रीलंका देशात सुद्धा यशवंत येनगूटीवार यांनी विविध शिल्प साकारून पाठविलेली आहेत. पिढी जात मूर्ती कलेला तांत्रिक व तर्कशुद्ध शिक्षणाची जोड मिळावी म्हणून मुंबई येथील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे यशवंत येनगूटीवार यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. बहुतांश शिल्पांची उंची सहा फूट ते नऊ फुटांपर्यंत राहणार आहे. विशिष्ट फायबर पासून ही शिल्प तयार करण्यात आली आहेत. अल्पकालावधीत म्हणजे केवळ दहा दिवसांच्या अंतरात ही सर्व शिल्प साकारण्यात आली आहे.

Tags:    

Similar News