मुंबई : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ग्लोबल मीडिया चॅम्पियनशिप क्रिकेट टूर्नामेंटचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षी ईस्टर्न प्रेस असोशिएशननं शानदार खेळ करत २०२५ ची चॅम्पियनशिप पटकावली. न्यूज १८ नेटवर्कचा त्यांनी ११ धावांनी पराभव केला.
अंतिम सामन्यात ईस्टर्न प्रेस असोशिएशनचे कर्णधार मनोज चंदेलिया यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. असोशिएशनच्या बॅट्समन्सनी शानदार फलंदाजी करत ४ षटकात ४१ धावा काढल्या. त्यानंतर उपविजेत्या न्यूज १८ नेटवर्कच्या फलदांजाना ईस्टर्न प्रेस असोशिएशनचं ४१ धावांचं आव्हान पूर्ण करता आलं नाही. कर्णधार मनोज चंदेलिया यांनी अंतिम सामन्यात टाकलेलं शेवटचं षटक हे निर्णायक ठरल्यानं ईस्टर्न प्रेस असोशिएशनला विजेतेपद मिळालं.
ग्लोबल मीडिया चॅम्पियनशिप क्रिकेट टूर्नामेंटमध्ये मुंबईतल्या मीडियामध्ये कार्यरत असणाऱ्या तब्बल १८ संघांनी सहभाग घेतला होता. चेंबूरच्या आरसीएफ इथल्या जवाहर मैदानाच्या टर्फवर ही टूर्नामेंट संपन्न झाली.
या टूर्नामेंटमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ईस्टर्न प्रेस असोशिएशनचे कर्णधार मनोज चंदेलिया तर मालिकावीर म्हणून असोशिएशनचे अष्टपैलू खेळाडू सचिन गायकवाड यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विजेत्या संघामध्ये साज प्रभू, गोपाल इंगळे, अक्षय झाकळ, ऋषिकेश म्हैसमाळे, आनंद गायकवाड, प्रेम ऊर्फ पवन जाधव, सचिन गायकवाड, नितीन गायकवाड, प्रतिक बेलवाडकर, संदीप शर्मा, तारिक, यांचा समावेश होता.