राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 25 किलोमीटरच्या अंतरावर शौचालय: मंत्री यशोमती ठाकुर
बुलडाण्यातील खामगाव ईथे ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ पार पडला. हा सत्कार समारंभ राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री म्हणाल्या की, बाळासाहेब थोरातांनी कठीण काळात प्रदेश कॉंग्रेसचे नेतृत्त्व केले आहे, आणि त्यांना दाद देणे हे आमचे काम आहे.
तसेच यावेळी भाषणात बोलताना त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकार नव्याने राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 25 किलोमीटरच्या अंतरावर शौचालय बांधणार आहे. याची अंमलबजावणी आता पर्यंत झाली नाही, आता मात्र यांची आम्ही अंमलबजावणी करणार आहे. कॉंग्रेस वर्कींग कमीटी ज्या नेत्याला अध्यक्ष निवडील त्या नेत्याला कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन पाहायला आवडेल असं मंत्री ठाकुर म्हणाल्या.