मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सत्कार केला होता. यावर काँग्रेस नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेत संतप्त प्रतिक्रिया दिली. मनोहर कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा खूप अपमान केलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेला हा सत्कार असहनीय असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.