China president : चीनच्या राष्ट्रध्यक्षपदी पुन्हा जिनपिंग, पण चर्चा मात्र पुतीनची
चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी तिसऱ्यांदा क्षी जिनपिंग यांची निवड करण्यात आली. त्यापार्श्वभुमीवर रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतीन आणि चीनचे राष्ट्रध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यातील साम्य यावर चर्चा सुरू झाली आहे. पण खरंच जिनपिंग आणि पुतीन यांच्यात साम्य आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा...;
क्षी जिनपिंग (Xi Jinping ) हे चीनचे तिसऱ्यांदा अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष (Russia President Vladimir Putin) व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली जात आहे. नेमकं जिनपिंग आणि पुतीन यांच्यात काय साम्य आहे? याचीच चर्चा सुरु आहे. त्याबाबत मॅक्स महाराष्ट्रने दोन्ही राष्ट्राध्यक्षांची तुलना केली आहे.
चीन आणि रशियाचा (China Russia) क्रमांक एकचा शत्रू अमेरिका (America) आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे अमेरिकेविरोधात कटकारस्थान करत आहेत. त्याबरोबरच दोन्ही व्यक्तीरेखांमधील साम्य म्हणजे पुतीन यांनी २०३६ पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी घटनेत बदल (Change Constitution ) केला आहे. त्याप्रमाणेच क्षी जिनपिंग यांनीही २३ ऑक्टोबर रोजी चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी कायम राहण्यासाठी घटनेत बदल केला आहे. त्यामुळे माओ (Mao) यांच्यानंतर जिनपिंग हे चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी तिसरी टर्म राहणारे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी विरोधी पक्ष असलेल्या नवाल्नी (Russia Opposition Leader ) यांच्यावर केलेला विषप्रयोग जगभर गाजला होता. त्याप्रमाणेच चीनमध्ये एकपक्षीय सरकार असल्याने चीनमध्ये जिनपिंग यांच्या नेतृत्वातील सरकारने सहा मंत्र्यांना मृत्यूदंड ठोठावल्याचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे पुतीन आणि जिनपिंग यांचा विरोधकांना गायब करण्याचा हातखंडा असल्याचे म्हटले जाते.
कोरोना विषाणूचा (Coronavirus) जन्म चीनमध्ये झाला असल्याचे म्हटले जाते.दुसरीकडे चीन कोरोनातून सावरल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र प्रत्यक्षात चीनची अर्थव्यवस्था (china Economy ) तीन टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे आर्थिक संकटामुळे चीन मेटाकुटीला आला आहे. त्यापार्श्वभुमीवर आर्थिक संकटावरील लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद आणि राष्ट्राभिमान यांचे डोस देण्यास जिनपिंग सरकारने सुरु केले आहे. त्यानुसार चीनमध्ये जिनपिंग यांची प्रवचने लोकांना ऐकवली जातात.
रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सध्या युक्रेनवर (Russia Ukraine ) केलेल्या हल्ल्याची जगभर चर्चा आहे. यापुर्वीही पुतीन यांनी क्रिमीयाचा (Crimia) घास घेतला आहे. आता पुतीन यांनी युक्रेन ताब्यात घेण्यासाठी युध्द सुरु केले आहे. त्याप्रमाणेच जिनपिंग (Jinping) यांनी याआधीच हाँगकाँग गिळंकृत केले आहे आणि आता तैवानवर (Taiwan ) ताबा मिळवण्याचा डाव जिनपिंग यांनी अधिवेशनात बोलून दाखवला आहे. त्यामुळे दोन्ही सत्ताधीश महत्वाकांशी आहेत. त्यामुळे भारताचे टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.