ट्विटर 'बंदी' वरून चेतन भगत आक्रमक
कधीकाळी मोदी भक्त असलेल्या लेखक चेतन भगत 360 डिग्री मधे बदलला असून त्याने आता ट्विटर बंदी वरून थेट आक्रमक होत मोदी सरकारला जाब विचारला आहे.;
भारतीय अर्थव्यवस्था वाढावी यासाठी देशातील वेगवेगळे तज्ञ आपली मतं मांडत असतात. दरवर्षीच्या अर्थसंकल्पामध्येही त्यावर चर्चा केली जाते. धोरणात्मक निर्णयही घेतले जातात. सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्याशी अतिशय जवळचा संबंध असणा-या या अर्थसंकल्पातून अनेक प्रश्न निर्माण होतात. सध्या कोरोनाच्या काळात देशाची आर्थिक व्यवस्था फारशी ठीक नसल्याचेही तज्ञांचे म्हणणे आहे. सरकारी तिजोरीवर बोजा वाढला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी यापूर्वी पंतप्रधानांनी परदेशी कंपन्यांना भारतामध्ये गुंतवणूकीसाठी आवाहन केले होते. प्रत्यक्षात चित्र वेगळे असल्याचे दिसून आले आहे.
सरकारवर टीका करणारे ट्विट काढून टाकण्यासाठी केंद्रसरकारने ट्विटर कंपनी वर दबाव आणला होता तो नाकारल्यानंतर
अलीकडेच केंद्र सरकारने ट्विटरच्या दिल्ली कार्यालयावर छापे टाकले होते.
यासगळ्या प्रकरणावर प्रसिध्द लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता चेतन भगत यानं व्टिट केलं आहे. चेतन भगत हा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असणारा सेलिब्रेटी आहे. त्याच्या पुस्तकांना असणारा वाचकवर्ग मोठा आहे. त्याची सोशल मीडियावरील एक प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. आताही तो चर्चेत आला आहे ते त्याच्या वक्तव्यामुळे. त्यानं भारतात ज्या परदेशी कंपन्या येणार आहेत त्यांच्या मनात भारताविषयी भीती असल्याचे दिसून आले आहे.
If you bully foreign companies on one hand and invite them to do business in India on the other, you will lose their trust.
— Chetan Bhagat (@chetan_bhagat) May 25, 2021
And trust, once broken, is very hard to fix.
Not worth it. You are not teaching them a lesson. You are shooting on the foot of your own economy.
चेतननं आपल्या व्टिटमध्ये लिहिले आहे की, एकीकडे आपण भारतात परदेशी कंपन्या यायल्या हव्यात असे म्हणतो. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे समजून घ्यायला हवे. यावेळी चेतननं सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यानं म्हटलं आहे की, जर तुम्ही परदेशी कंपन्यांना धमकावणार असला तर त्या भारतात कशाला येतील. त्यांना भारतात व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी त्या येत आहेत. मात्र त्यांना मिळणारा प्रतिसाद नकारात्मक आहे असे म्हणावे लागेल. एकंदरीतच मोदी सरकारचे चाहते आणि भक्त ही आता डगमगले असून सरकार विरोधात थेट त्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे.