कोरोनाबाबत गंभीर इशारा देणाऱ्या बिल गेट्स यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

Update: 2022-05-11 11:30 GMT

संपुर्ण जगात कोरोना (Corona) नियंत्रणात येत असल्याचे तज्ञांकडून बोलले जात असतानाच (Microsoft) मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी केलेल्या भाकीतामध्ये जगाला मोठा इशारा दिला होता.या इशाऱ्याच्या काही दिवसानंतर त्यांना आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

बिल गेट्स यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली. बिल गेट्स (Bill gates) यांनी ट्विटमध्ये म्हटलेय, कोरोना पॉझिटिव्ह आढळलो असलो तरी सौम्य लक्षणे आहेत. सध्या आयसोलेट असून बरा होत नाहीत तोपर्यंत एकाकी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मी भाग्यवान आहे की मला लसीकरण करण्यात आले आहे आणि मी बूस्टर देखील घेतला आहे आणि मला चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. असे बिल गेट्स असे बिल गेट्स ट्विटमध्ये म्हणालेत.

बिल गेट्स यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाबाबतीत इशारा दिला होता. ते असे म्हणाले होते की, आतापर्यंत आपल्याला सरासरीच्या ५ टक्क्यांपेक्षा जास्त धोका जाणवलेला नाही.कोरोनाचा अधिक संसर्गजन्य आणि अधिक घातक व्हेरिएंट येण्याचा धोका आहे.त्यामुळे या महामारीचा सर्वात वाईट टप्पा अजून पाहायचा बाकी आहे.

Tags:    

Similar News