वर्धा बस स्थानकावर महिलेचे दागिने पळविले; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-09-24 11:31 GMT
वर्धा बस स्थानकावर महिलेचे दागिने पळविले; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
  • whatsapp icon

वर्धा शहर बसस्थानकावर एक महिला आपल्या पतीसह बसमध्ये चढत असताना तिच्या बॅगमध्ये असलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि लक्ष्मी हार असे चार तोळे सोनं चोरट्याने पळविल्याची घटना समोर आली. हा चोरीचा संपूर्ण प्रकार बस स्थानकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याबाबत वर्धा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरातील व्हिडीओची तपासणी केली असता एक युवती महिलेच्या मागून येत बसमध्ये चढत असताना संधी साधून बॅगमधून चैन तोडून सोन्याचे दागिने पळविल्याची संशय त्या युवतीवर व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे

वर्ध्यातील गुंफा गोपालराव बद्रे असं दागिने चोरी गेलेल्या महिलेचे नाव असून, त्या पतीसह शहर बस स्थानकावरून आकोट जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना हा प्रकार घडला आहे.

Tags:    

Similar News