हॉस्पिटलमध्ये नमाज पठन करणे गुन्हा आहे का?
RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिदीमध्ये जाऊन हिंदू-मुस्लिम एकतेचा नारा दिला. मात्र उत्तरप्रदेशात महिलेने रुग्णालयात नमाज पठन केल्याने वाद निर्माण झाला आहे.;
मोहन भागवत यांनी दिल्लीतील मशिदीत जाऊन इमामांची भेट घेतली. यानंतर देशातील हिंदू-मुस्लिमांचा डीएनए एकच असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर या घटनेला काही तास उलटत नाहीत, तोच उत्तर प्रदेशात मुस्लिम महिलेने रुग्णालयात नमाज पठन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर News24 ने प्रयागराजमध्ये महिलेने रुग्णालयात नमाज पठन केले. त्यानंतर त्या महिलेविरोधात FIR दाखल करण्यात आल्याचा दावा ट्वीटरवर केला आहे. या ट्वीटला रिट्वीट करून MIM खासदार असदउद्दीन ओवैसी यांनी उत्तरप्रदेश पोलिसांवर टीकास्र सोडले आहे.
खासदार असदउद्दीन ओवैसी यांनी News24 ची बातमी रिट्वीट करून म्हटले आहे की, रुग्णालयात नातेवाईकांवर उपचार सुरू असताना एका महिलेने कुणाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता आपल्या धर्माची प्रार्थना केली. मग यामध्ये गुन्हा काय आहे? याव्यतिरीक्य उत्तरप्रदेश पोलिसांकडे दुसरं कोणतंही काम नाही का? जिथे कुठे नमाज पठन केले जाते तिथे नमाजींवर FIR दाखल केली जाते, असं म्हणत ओवैसी यांनी उत्तरप्रदेश पोलिसांवर टीकास्र सोडले आहे.
अस्पताल में भर्ती, अपने रिश्तेदार की देख-भाल करने वाले किसी कोने में, किसी को तकलीफ़ दिए बग़ैर,अपने मज़हब के मुताबिक़ इबादत करते हैं तो इस में जुर्म क्या है? क्या UP पुलिस के पास कोई और काम नहीं है? जहाँ भी नमाज़ पढ़ी जाती है, वहां नमाज़ियों पर FIR दर्ज हो जाती है। https://t.co/HlPlyUPSV2
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 23, 2022
यानंतर News24 ने आपल्या ट्वीटर हँडलवरून प्रयागराज पोलिसांचे ग्राफिक्स पत्र ट्वीट केले आहे. त्यात महिलेने रुग्णालयात नमाज पठन केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर प्रयागराज पोलिसांनी स्पष्टीकरण दिल्याचे म्हटले आहे.
News24 ने ट्वीट केलेल्या पत्रावरील ट्वीटर अकाऊंटला मॅक्स महाराष्ट्रने भेट दिली. यामध्ये हे पत्र आढळून आले. मात्र हे ट्वीटर हँडल व्हेरिफाईड नसल्याचे दिसून आले. मात्र या ट्वीटर हँडलवर हे पत्र पहायला मिळाले. या पत्रात म्हटले आहे की, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या चौकशीनंतर त्या व्हिडीओत दिसत असलेली महिलेने चुकीच्या उद्देशाने हे कृत्य केले नाही. कुणालाही त्रास न देता महिलेने रुग्णालयातील आपला नातेवाईक लवकर बरा व्हावा, म्हणून नमाज पठन केले. त्यामुळे त्या महिलेचे कृत्य कोणत्याही गुन्हेगारी प्रकारात येत नाही.
त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लिम एकीबाबत वक्तव्य केलं असतानाच हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अशा प्रकारे व्हिडीओ व्हायरल केले जात असतील तर देशात हिंदू-मुस्लिम एकी कशी निर्माण होईल, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.