अंबरनाथ मध्ये गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक ; १ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त

Update: 2021-11-22 05:06 GMT

कल्याण : अंबरनाथमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या महिलेला अंबरनाथ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित महिलेकडून १ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून महिलेला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस सागर मुंडे यांना गुप्त माहितीच्या आधारे एक महिला गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अरुणा हिरालाल जाधव या महिलेला वांद्रेपाडा भागात ५ किलो गांजा विक्री करताना अटक केली. महिलेकडून १ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. महिलेला न्यायालयात हजर करत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News