अहमदनगर महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू

Update: 2021-11-12 04:05 GMT

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महापालिका आयुक्तांनी आरोग्य समितीची अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. सोबतच या समितीने 7 दिवसात अहवाल सादर करावा असे आदेश आयुक्तांनी दिले आहे.

या समितीत डॉ. सागर बोरुडे हे अध्यक्ष तर अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, डॉ. प्रवीण डुंगरवाल आणि डॉ. जयश्री रौराळे यांचा समावेश आहे. दरम्यान या समितीने रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या अरुंधती कृष्णा बिस्वाल यांचा प्रसुतीनंतर झालेल्या मृत्यूप्रकरणी सर्व संबंधितांचे जबाब नोंदवून सखोल चौकशी करावी तसेच पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवाव्यात आणि चौकशी अहवाल 7 दिवसात सादर करण्याचे निर्देश आयुक्त शंकर गोरे यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या कै. देशपांडे रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या अरुंधती बिस्वाल या महिलेचे सीझर केल्यानंतर तिची प्रकृती खालावली त्यामुळे या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. या दरम्यान तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त समोर येताच आमदार संग्राम जगताप यांच्यासह आयुक्त शंकर गोरे महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे , उपसभापती मीनाताई चोपडा मनपाच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक संजय चोपडा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी देशपांडे रुग्णालयास भेट दिली. यावेळी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय झाला , त्यानंतर सायंकाळी आयुक्तांना लेखी आदेश काढत समिती नियुक्त केली.

Tags:    

Similar News