आमदार अपात्रतेसंदर्भात आज तरी निर्णय होणार का ?

Update: 2024-01-10 02:59 GMT

आज आमदार आपात्रतेसंदर्भातील निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आजच्या दिवसाची अंतिम मुदत देण्यात आली होती. पण आज निकाल दिला जाणार का? यावर अॅड. असीम सरोदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कारण या प्रकरणाशी संबंधित वकिलांना या निकालाबाबत अद्याप कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे हा निकाल आज होणार का ? तो कधी होणार यावर आता तर्क वितर्क लढवले जात आहेत. काय म्हटलंय अॅड. असीम सरोदे यांनी वाचा

अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे मात्र आज निर्णय होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील वकील म्हणून मला किंवा इतर वकिलांना Maharashtra Legislative Assembly सचिव यांच्याकडून इमेल आलेली नाही की राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार?

कदाचित अगदी वेळेआधी कळतील की किती वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जमायचे आहे? पण जर 400 ते 500 पानांचा निर्णय तयार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निर्णय देणे आवश्यक आहेच तर किती वाजता निर्णय जाहीर करणार हे कळवायला इतका उशीर का?

Tags:    

Similar News