नैसर्गिक आपत्तीबाबत अभ्यास करुन नियोजन करणार- गृहमंत्री पाटील

नैसर्गिक आपत्तीबाबत अभ्यास करुन नियोजन करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

Update: 2021-07-25 11:49 GMT

पुणे // रायगड जिल्ह्यात तळये गावात जी दरड कोसळून जीवितहानी झाली याकरता शास्त्रीय अभ्यास करुन नियोजन करण्याची गरज आहे असं मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

सरहद संस्थेच्या वतीने कारगिल विजय दिवसाला बावीस वर्ष पुर्ण झाली त्यानिमित्ताने कोरोना काळात विशेष काम करणाऱ्यांचा सन्मान वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना वळसे पाटील म्हणाले की राज्यात आलेली पुरपरिस्थिती भयानक असून अशी परिस्थिती राज्यात पुन्हा येऊ नये यासाठी राज्य सरकार ठोस पाऊलं उचलणार आहे. माळीणमध्ये ज्या पध्दतीने कायमस्वरुपी नागरिकांचे पुर्नवसन करण्यात आले तसेच कोकणातील नागरिकांचे पुर्नवसन करण्यात येईल असं पाटील यांनी स्पष्ट केलं. ट

आंबेगाव परिसरात दरडप्रवण क्षेत्राची करणार पाहणी

दरम्यान पश्चिम घाटाकरता गाडगीळ समितीचा अहवाल का स्विकराला नाही? अशा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता 'याबाबत मला माहिती नाही' मात्र, राज्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान राज्यात दरड कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर दिलीप वळसे पाटील आंबेगाव परिसरात दरडप्रवण क्षेत्राची पाहणी करणार आहेत.

कुंद्रा प्रकरणात मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने

राज कुंद्रा प्रकरणात मुंबई पोलीस सध्या चांगला तपास करत असुन अशा गोष्टी समुळ नष्ट केल्या जाणार आहे. तसेच पॅगेससचा वापर करुन राज्यात फोन टॅप करणे किंवा वॉच ठेवणे अशा घटना समोर येत आहेत तर याबाबतीत विशेष काम सुरू असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

Tags:    

Similar News