Russia Ukraine War : युध्द थांबणार का?

युक्रेन आणि रशियात युध्द सुरू आहे. तर नाटो देशांनी युक्रेनमला लष्करी मदत करणार नसल्याची घोषणा केली. त्यापार्श्वभुमीवर युक्रेनने रशियाला चर्चेचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर रशियाने प्रत्युत्तर दिले आहे.;

Update: 2022-02-25 16:25 GMT

रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाने युध्दाचे रुप घेतले. तर दोन दिवसात रशियाने युक्रेनच्या राजधानीसह अनेक शहरे ताब्यात घेतले. मात्र युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन देणाऱ्या नाटो देशांनी युक्रेनला लष्करी सहाय्य करण्यास नकार दिला. त्यामुळे युक्रेनची मोठी कोंडी झाली. त्यापार्श्वभुमीवर युक्रेनच्या पंतप्रधानांनी रशियाकडे चर्चेचा प्रस्ताव पाठवला. त्याला रशियाने सकारात्मक प्रतिसाद देत चर्चेची तयारी दर्शवली आहे.

रशिया आणि युक्रेन युध्दात युक्रेनमधील पायाभुत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. तर रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यापार्श्वभुमीवर युक्रेनचे पंतप्रधान वोलोडोमिर झेलेन्स्की यांनी रशियाला चर्चेचा प्रस्ताव पाठवला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत रशियाने आपले शिष्टमंडळ युक्रेनमध्ये पाठवण्याची तयारी दर्शवली आहे. तर हे शिष्टमंडळ युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार आहे.

रशिया आणि युक्रेन या दोन देशात निर्माण झालेल्या युध्दामुळे जगात तिसरे महायुध्द सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर अमेरीकेसह नाटो देशांनी युक्रेनला पाठींबा दिला होता. मात्र आज प्रत्यक्षात रशियाने युक्रेनच्या अणुउर्जा प्रकल्पासह अनेक शहरांवर ताबा घेतल्यानंतर नाटो देशांनी युक्रेनला लष्करी सहाय्य देण्याचे नाकारले. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या युक्रेनने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना चर्चेचा प्रस्ताव पाठवला. त्याला रशियाने सकारात्मक प्रत्युत्तर दिले असून त्यासाठी रशिया उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवणार असल्याची भुमिका पुतीन यांनी घेतली आहे, असे चीनने सांगितले.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी क्षीनपींग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. त्यामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युध्दाचे ढग निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेले युध्द थांबणार का? हे या चर्चेनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

Tags:    

Similar News