पिकविम्यासाठी आवाज उठवणार - अंबादास दानवे

Update: 2023-08-27 15:55 GMT

मराठवाडा ही संताची भूमी आहे, या मराठवाड्याने गद्दारांना कधीही साथ दिली नाही, हा इतिहास आहे. मराठवाड्यात गद्दार गाडले जातील, शेतकऱ्याला विमा मिळाला पाहिजे यासाठी शिवसेना लढा उभारेल असा इशारा ठाकरे गटाचे नेते, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.

दरम्यान अंबादास दानवे म्हणाले की "सरकारने १ रुपयाचा पिक विमा काढायला सांगितला, एक रुपया शेतकऱ्यांसाठी दिला. परंतू आता पाऊस नाही. २१ दिवस पाऊस नसला तर २५ टक्के रक्कम विम्याची दिली पाहिजे. कृषी मंत्र्यांनी आठ दिवसात पंचना करू असं सांगितले होते. २५ टक्के रक्कमं शेतकऱ्याला मिळाली पाहिजे या संदर्भात शिवसेना (उबाठा) गट आवाज उठवाणार आणि शेतकऱ्याला मिळवून देणार. येणाऱ्या काळात शेतकऱ्याला विमा मिळाला पाहिजे यासाठी शिवसेना लढा उभारेल असं मतं दानवे यांनी व्यक्त केलं.

दरम्यान अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सभेसाठी येण्यासाठी गाड्या लावाव्या लागत नाही. काही जण हिंगोलीत कावड यात्रा श्रद्धेसाठी नाही तर स्वत:ची मार्केटिंग व्हावी म्हणून काढणारे आमदार आहेत, असे म्हणत संतोष बांगर यांच्यावर अंबादास दानवे यांनी टीकास्त्र डागले आहे. हिंगोली जिल्ह्यातील दोन नंबरचे धंदे करा म्हणत युवकांना तयार करणाऱ्या नेत्याच्या तावडीत हा जिल्हा अडकला आहे असे म्हणत अंबादास दानवे यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. यावेळी बोलंत असताना अंबादास दानवे म्हणाले की, कृषीमंत्र्यांनी मराठवाड्यात आठ दिवसात बैठक घेऊ सांगितले होते, अद्याप त्यांनी बैठक घेतली आहे, अशी टीका दानवे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकास करीत नाही, पण विरोध करतात. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना पुरेशी कर्जमाफी केली नाही, पण उद्धव ठाकरे यांनी 99 टक्के कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी केली.


Full View

Tags:    

Similar News