योग्यवेळी सीडी लावणार; एकनाथ खडसेंचा पुन्हा एकदा इशारा

Update: 2021-08-29 13:35 GMT

 23 ऑक्टोबर 2020 ला भाजपला राम राम ठोकत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यावेळी बोलताना खडसे यांनी... जयंत पाटील यांच्या एका प्रश्नावर बोलताना सांगितलं होते की,

मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन.

असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं होतं.

त्यानंतर खडसे यांच्या विरोधात सध्या ED ची चौकशी सुरु आहे. त्यामुळं खडसे यांच्याकडे असलेली सीडी ते कधी बाहेर काढणार? असा सवाल माध्यमांनी केला असता, खडसे यांनी आपण योग्यवेळी सीडी लावणार असल्याचं उत्तर दिलं आहे.

दरम्यान जे भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्याचा देखील समाचार यावेळी खडसे यांनी घेतला आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माझी ईडी लावली तर सीडी बाहेर काढीन असं विधान केलं होतं. त्यानंतर खडसेंची ईडीकडून चौकशी करण्यात आली तरी त्यांनी सीडी बाहेर काढली नव्हती. त्यावरून खडसेंना डिवचण्यातही आले होते. मात्र, आता खडसेंनी पहिल्यांदाच सीडीबाबत भाष्य केलं आहे. योग्यवेळी मी सीडी लावणार आहे, असा इशाराच एकनाथ खडसे यांनी दिला आहे. (Will play CD soon, Eknath Khadse warns BJP against use of central agency)

एकनाथ खडसे यांनी मीडियाशी बोलताना हा इशारा दिला. ईडी लावली तर सीडी लावेन असं मी म्हणालो होतो. हे खरं आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असं खडसे म्हणाले.


Tags:    

Similar News