ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दिल्लीत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच दिल्ली कडे येणाऱ्या ऑक्सिजनच्या गाड्या थांबवल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात दिल्लीच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेच्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने कडक शब्दात आपला निर्णय सांगितला.
केंद्र आणि राज्य शासनाचा कोणताही कर्मचारी ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये बाधा आणणार नाही. जर असं झालं तर त्याला फासावर लटकवलं जाईल. अशा शब्दात न्यायालयाने याबाबत आज आपला निर्णय दिला.
दिल्ली च्या महाराजा अग्रसेन रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता आहे. या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.
यावेळी न्यायाधीश जस्टिस विपिन सांघी आणि रेखा पल्ली यांच्या बेंचने आपला निर्णय देताना ऑक्सिजन थांबणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. अशा शब्दात ऑक्सिजन अडवणाऱ्या व्यक्तींना तंबी दिली आहे.