दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होणार: दादा भुसे

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का? कृषी मंत्र्यांचा शब्द पूर्ण होणार का?;

Update: 2021-10-26 05:29 GMT

दिवाळीच्या अगोदर राज्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.यासंदर्भात कृषिमंत्री दादा भुसे यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. ते जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या विविध योजनेचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

दोन दिवसानंतर 3 हजार 600 कोटी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून जून महिन्यात झालेल्या नुकसानीचे 350 कोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत असल्याची माहिती भुसे यांनी दिली आहे. जसे जसे पंचनाम्यांचे कागदपत्रे राज्य सरकारकडे येतील. तशी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करणार असल्याचं देखील कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News