विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीबाबतचे संविधान तरतुदींचा विचार करु - नार्वेकर
मुंबई,अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देत शिंदे- फडणवीस सरकार मध्ये सामिल होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर गेल्या एक महिन्यापासून राज्याचा विरोधी पक्ष नेता निवडण्यात आला नव्हता. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीत जास्त आमदार असल्याने असल्याने विरोधी पक्ष नेते पद राष्ट्रवादीकडे होतं. अजित पवार यांच्या फुटी नंतर विरोधी पक्ष नेते पद रिक्त झाले होते. त्यामुळे राज्यातील मानल्या जाणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यावर कोणाचीच नियुक्ती झाली नव्हती. सध्या काँग्रेस संख्याबळ अधिक असल्याने काँग्रेस कडून विरोधी पक्ष नेते पदाचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी काँग्रेस नेतृत्वाकडून काँग्रेसचे चंद्रपूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेते पदी नाव जाहिर करण्यात आले.
त्याबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन वडेट्टीवार यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र दिले. त्यानंतर आता अध्यक्ष नार्वेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीबाबतचे पत्र मला काँग्रसेनं दिलं आहे. पण त्यावर संविधान तरतुदींचा विचार करून निर्णय घेऊ असे अध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तर योग्य त्या गोष्टी तपासून निर्णय घेऊ असेही त्यांनी म्हटलं आहे.