पुण्यात पुन्हा एक गवा; वनविभाग, पोलीस अधिकारी घटनास्थळी

सोशल मिडीयातून गव्याच्या मृत्यूप्रकरणी हळहळ व्यक्त केल्यानंतर आज पुण्यात पुन्हा एकदा गवा दिसला आहे. वनविभाग आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आहे. नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन यंत्रणेकडून केले जात आहे. बघ्यांची गर्दी टाळण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.;

Update: 2020-12-22 09:35 GMT

पुण्यात पुन्हा एकदा गवा दिसून आला आहे. बावधन परिसरात गव्याचे दर्शन झाले असून, जवळच डोंगर आणि जंगल परिसर असून, तेथून हा गवा बावधन परिसरात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात घुसलेल्या गव्याचा मृत्यू झाला होता.

९ डिसेंबर रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात गवा दिसला होता. या गव्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांनी प्रयत्न केले. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर गव्याला पकडण्यात यश आले होते. मात्र, थोड्या वेळातच गव्याचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा गव्याचं दर्शन झालं आहे. या गव्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. गवा आढळण्याची ही दुसरी वेळ आहे. नागरिकांनी गव्याला बघण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन केले जात आहे.

Full View

Similar News