मिसेस मुख्यमंत्रीही कोरोना पॉझिटिव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामना दैनिकाच्या संपादिका रश्मी ठाकरेंना कोरोनाची बाधा झाली आहे.;

Update: 2021-03-23 16:02 GMT

मुख्यमंत्री पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरेंनाही कोरोनाची लागण झालीय. त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन होणार आहेत. रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच स्वतः मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती.

काही दिवसापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. राज्यात दुसऱ्या लाटेत पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून काळजी घेण्याचं आवाहन

राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. मात्र, गेल्या महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. राज्यात आज 28,699 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2247495 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 230641 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.73% झाले आहे.

Tags:    

Similar News