पतीचे उत्पन्न जाणून घेण्याचा पत्नीला अधिकार
पत्नीपासून आपले उत्पन्न लपवताय? मग ही बातमी वाचा....;
नवऱ्याच्या पगारासह त्यांच्या इतर सर्व आर्थिक व्यवहारांचा तपशील जाणून घेण्याचा अधिकार पत्नीला आहे आणि माहिती अधिकाराअंतर्गत पत्नी तशी माहिती मागू शकते, असा ऐतिहासिक निकाल केंद्रीय माहिती आयोगाने दिला आहे. राजस्थानमधील एका प्रकरणात माहिती आय़ोगाने हा निर्णय दिला आहे. जोधपूरमधील
रहमत बानो या महिलेने तिच्या पतीच्या एकूण उत्पन्नाची माहिती इनकम टॅक्स विभागाकडे मागितली होती. पण अशी माहिती आपल्या पत्नीला देऊ नये अशी भूमिका त्यांच्या पतीने घेतली होती. पण इनकम टॅक्स विभागाने अशी माहिती देण्यास नकार दिला. यावर रहतम यांनी केंद्रीय माहिती आय़ोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर केंद्रीय माहिती आयोगाने15 दिवसांच्या आत संबंधित महिलेला माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
रहमत यांनी पतीकडून पोटगीची मागणी केल्यानंतर त्यांचे उत्पन्न किती आहे यासंदर्भात त्यांना माहिती हवी होती.