कर नाही तर डर नाही; मग मंत्रिमंडळाची बैठक रद्द कशाला ?
निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेवरुन महाविकास आघाडी सरकारमधे अस्थिरता निर्माण झाली असून काल पोलिस दलात मोठे बदल केल्यानंतर आज होणारी साप्ताहीक मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्याची वेळ सरकारवर आली आहे. कर नाही तर डर कशाला? मग आयत्या वेळी मंत्रिमंडळाची बैठक रद्द का केली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.;
विधीमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय आधिवेशन अर्थसंकल्पावर चर्चा झाली नाही. पोलिस अधिकारी सचिन वाझेच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लक्ष केले होते. उद्योगपती मुकेश अंबानीच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांनी थेट आरोप वाझेवर केला होता. त्यानंतर गाडीचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला. या प्रकरणी शेवटच्या टप्प्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताबा घेतल्यानंतर सचिन वाझेला अटक झाल्या राज्य सरकार बॅकफुटवर आले.
एकापाठोपाठ एक खुलासे बाहेर येत असताना काल पोलिसदलात मोठे बदल करुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांना हटवून त्यांच्या जागी हेंमत नगराळेंना नेमणुक देण्यात आली. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी या प्रकरणामधे मास्टरमाईंड सरकारमधील मंत्री असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा संशयाची सुई सरकारकडे वळली आहे. गेली तीन दिवस महाविकास आघाडी सरकारमधे बैठकांचे सत्र सुरु आहे. आज नियमितपणे होणारी साप्ताहीक मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याने नेमकं आघाडी सरकारमधे चाललयं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.