एखाद्या न्यूज अँकरचे नाव ट्विटरवर ट्रेन्डिंगमध्ये १ नंबरला येणे ही बाब तशी त्या अँकरसाठी महत्त्वाची आहे. पण आज तकच्या अँकर अंजना ओम कश्यप यांच्याबाबतचा #ShameOnYouAnjana हा हॅशॅग सध्या नंबर वनवर आहे. तब्बल ५० हजार जणांना हा हॅशटॅग वापर अंजना ओम कश्यपवर जोरदारी टीका केली आहे. गोदी मिडियाच्या अँकर म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात येते आहे. ५ राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर उ. प्रदेशातील राजकीय नेत्यांच्या मुलाखती सध्या टीव्ही चॅनेलवर झळकत आहेत. या अनुषंगाने अंजना ओम कश्यप यांनी योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांची मुलाखथ घेतली. या दोन्ही मुलाखती सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत.
@Deepakkhatri812 या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने ट्विट करत योगी आदित्यनाथ यांच्या मुलाखतीचा काही भाग शेअर केला आहे. "हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंजना ओम कश्यपला गोदी मीडिया आणि दलाल पत्रकार का म्हणतात हे तुम्हाला कळेल" असे त्यांनी म्हटले आहे.
After watching this video you will understand why Anjana Om Kashyap is called Godi media and Dalal journalist#ShameOnYouAnjana pic.twitter.com/saevGhc1uI
— 𝐃𝐞𝐞𝐩𝐚𝐤 𝐤𝐡𝐚𝐭𝐫𝐢 (@Deepakkhatri812) January 11, 2022
तर निवृत्त IAS अधिकारी सूर्यप्रताप सिंग यांनीही मुलाखतीचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे, "देश के लिए देखना जरूरी है कि इन्हीं @anjanaomkashyap ने योगी आदित्यनाथ की का इंटरव्यू किस भाषा में लिया था। पर विपक्ष का नेता सामने आते ही भाषा में अहंकार और बदतमीज़ी कैसे आ जाती है? गोदी मीडिया को उसी की भाषा में जवाब दीजिए।" असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी उ. प्रदेशातील गुन्हेगारीबद्दल योगींना अंजना ओम कश्यपने जाब विचारला का, असा सवाल उपस्थित केला आहे.
क्या आज तक और अंजना जी ने @myogiadityanath से ये सवाल पूछा?
— Surya Pratap Singh IAS Rtd. (@suryapsingh_IAS) January 11, 2022
या उनका सोने और जागने का कार्यक्रम, कुत्ते का नाम और उनकी तारीफ ही पत्रकारिता है?#ShameOnYouAnjana pic.twitter.com/K9Lwea06b3
एवढेच नाही तर ट्विटवर आज तक न्यूज चॅनेलच्या सर्व अँकर्सना ट्रोल केले जात आहे. गोदी मीडिया पत्रकार म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
No caption needed 😷😷#ShameOnYouAnjana pic.twitter.com/4icTO4D1Dy
— Political Abba (@Political_Abba) January 11, 2022