का ट्रेंड होतोय #नाथूराम_गोडसे_जिंदाबाद ट्रेंड?

जेव्हा महात्मा गांधी यांचा विषय येतो तेव्हा #नाथूराम_गोडसे_जिंदाबाद हा ट्रेंड सोशल मीडियावर का ट्रेंड केला जातो? काय आहे ही मानसिकता? काय आहे संघाचा खरा अजेंडा वाचा तज्ज्ञांचं मत काय?

Update: 2021-10-02 12:35 GMT

जेव्हा जेव्हा महात्मा गांधी यांचा विषय येतो. तेव्हा गोडसे मुद्दाम ट्रेंड केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना महात्मा गांधी यांचं महात्म समजून सांगितलं होतं. तेव्हा देखील नथुराम गोडसे ट्रेंड झाला होता.

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भेटीत गांधी जयंतीची चर्चा झाल्यानंतर मोदी यांच्या वक्तव्यावरुन सोशल मिडीयात मोदींवर जगात 'गांधी' भारतात' गोडसे असा शाब्दीक हल्ला करण्यात आला होता.

मात्र, गांधी जयंतीच्या निमित्ताने नेटकऱ्यांचं म्हणणं कट्टरतावाद्यांनी सिद्ध केल्याचं दिसून येत आहे. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने जगभरात लोक महात्मा गांधी यांचे विचार सोशल मीडियावर मांडत असताना काही समाजकंटकांनी नथुराम गोडसे सोशल मीडियावर ट्रेड केल्याचं दिसून येतं.

का ट्रेंड होतोय #नाथूराम_गोडसे_जिंदाबाद ?

आज गांधी जयंतीच्या निमित्ताने जगभरातून गांधी विचार सोशल मीडियावर मांडले जात असताना #नाथूरामगोडसेजिंदाबाद? असा ट्रेंड कट्टर उजव्या विचारसरणीचे लोक ट्रेंड करताना दिसत आहे. यामध्ये ते महात्मा गांधी हे पाकिस्तान प्रेमी असल्याचा दावा करत आहेत.

हिमांशू वैशिष्ट यांनी देखील या संदर्भात ट्वीट केलं आहे.

दरम्यान या ट्रेड मागे RSS संघ असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं हाच खरा अजेंडा आहे का? असा सवाल या निमित्ताने होतो.

हाच खरा संघाचा अजेंडा आहे का?

या संदर्भात आम्ही महात्मा गांधी यांचे पनतू तुषार गांधी यांच्याशी बातचीत केली ते म्हणाले यामागे आरएसएस ची विचारधारा आहे. हे काही लपून राहिलेले नाही. या लोकांचं नथुराम गोडसे यांच्यावर किती प्रेम आहे. हे सगळं जग जाणतं. गांधीचं नाव घेणं हे एक ढोंग आहे.

परदेशात त्यांना गांधीजींचा आधारा घ्यावा लागतो. त्यांना परदेशात महात्मा गांधी यांचा जयजयकार करावा लागतो. मात्र, हे सगळं त्यांचं ढोंग आहे. हा सगळा खोटा दिखावा आहे. नथुराम गोडसे हेच त्यांचं खरं सत्य आहे. गांधींचा द्वेष करणं हेच त्यांचं अस्तित्व आहे. त्यांना जगाला दाखवण्यासाठी महात्मा गांधी यांचं नाव घ्यावं लागतं. मात्र, त्यांच्या मनात गोडसेच आहे. जगाच्या समोर जेव्हा जेव्हा गांधी विचार मांडले जातात. तेव्हा अशा प्रकारे गांधी द्वेष करून गांधींना विरोध करण्याचं काम हे लोक करत आहेत.

असं परखड मत तुषार गांधी यांनी व्यक्त केलं आहे.

या संदर्भात आम्ही प्राध्यापक हरी नरके यांच्याशी बातचीत केली ते म्हणाले... नथुराम गोडसे हा भारताचा पहिला दहशतवादी होता. त्याच्या अतिरेकी विचारसरणीमुळे भारावून त्याने राष्ट्रपित्याची हत्या केली. त्या नथुराम गोडसे चा लोकशाही आणि भारतीय राज्य घटनेच्या संरक्षणात जयजयकार करणं भेकडपणाची कमाल आहे. या विकृत मनोवृत्ती विरुद्ध गांधी, फुले, आंबेडकर विचारसरणीने कणखरपणे मुकाबला करायला हवा. हा जाती वर्ण वर्चस्ववादी विचार म्हणजे भयंकर कॅन्सर असून त्याला गेल्या 7 वर्षात बळ मिळालेले आहे. 2024 साली भारतीयांनी ही बोगस मनोवृत्ती उखडून काढली पाहिजे. मी या वृत्तीचा निषेध करतो. असं मत हरी नरके यांनी व्यक्त केलं आहे.

या संदर्भात आम्ही ज. वी. पवार यांच्याशी बातचीत केली. हिंदूत्ववादी गोडसेचे उदात्तीकरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अवहलन: ज. वी. पवार या संदर्भात आम्ही ज. वी. पवार यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले...सातत्याने गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्याला विरोध करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा गांधीजींचे खूनी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहे. हे केवळ हिंदूत्वादाविरोधी चालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवहलनासाठीच बाबासाहेबांनी भारतीय संविधानामार्फत हिंदुत्वाचा पाया उखडून ठाकला. त्याच संविधानाच्या रक्षणकर्त्या उच्च न्यायालयाच्या आवारात गोडसेचा पुतळा बसवणे म्हणजे संविधानाचा व संविधान कर्त्याचा घोर अवमान करण्यासारखे आहे. गांधीजींच्या आडून आरएसएस कुटील डाव खेळत आहे. याला प्रखर विरोध करणे प्रत्येक भारतीयाचं आद्यकर्तव्य आहे. गोडसे च्या उदात्तीकरणाचा मी तीव्र निषेध करतो. असं मत ज. वी पवार यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलं आहे.

Tags:    

Similar News