भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला धर्मनिरपेक्ष नागरी संहितेकडे (सेक्युलर सिव्हील कोडवर) वाटचाल करावी लागेल असं म्हटलं आहे. मोदींनी पहिल्यांदाच असा उल्लेख केल्यामुळे सर्वांचेच कां टवकारले आहे. मोदींनी समान नागरी संहितेच्या बाबतीत नव्याने अशी मांडणी का केली असावी यावर आता चर्चा सुरु झाली आहे. याबाबत विश्लेषण केलं आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.