RahulGandhi राहुल गांधींना का वाजत नाही थंडी ?
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात भारत जोडो (Bharat jodo yatra )यात्रा सुरु आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने विविध सामाजिक आर्थिक मुद्दे पुढे येत आहेत. पण सर्वात जास्त चर्चा होत आहे ती वेगळ्याच गोष्टींची. या अगोदर देखील राहुल गांधी यांचा टी शर्ट ( price of Gandhis t shirt) ट्रेंडिंग चा विषय बनला होता. त्याच्या किमतीवरून देखील राहुल गांधी यांना ट्रोल केले गेले होते.;
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात भारत जोडो (Bharat jodo yatra )यात्रा सुरु आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने विविध सामाजिक आर्थिक मुद्दे पुढे येत आहेत. पण सर्वात जास्त चर्चा होत आहे ती वेगळ्याच गोष्टींची. या अगोदर देखील राहुल गांधी यांचा टी शर्ट ( price of Gandhis t shirt) ट्रेंडिंग चा विषय बनला होता. त्याच्या किमतीवरून देखील राहुल गांधी यांना ट्रोल केले गेले होते.
पुन्हा राहुल गांधी यांचा हाच टी शर्ट चर्चेचा विषय बनला आहे . देशात पारा घसरलेला असताना भारत जोडो यात्रेत राहुल गांधी ( Rahul Gandhi ) केवळ टी शर्ट घालून चालत आहेत. त्यांना थंडी वाजत नाही का ? असा प्रश्न त्यांना विचारला जात आहे. या प्रश्नाला स्वतः राहुल गांधी यांनीच उत्तर दिले आहे. "यात्रेमध्ये मी टी शर्टवर चालत आहे. परंतु माझ्यासोबत अनेक कामगार, गरीब शेतकऱ्यांची मुलं देखील या थंडीत चालत आहेत. त्यांच्या अंगात स्वेटर नाही . त्यांचे कपडे फाटलेले आहेत. पण माध्यमे त्या मुलांना प्रश्न विचारत नाहीत. या कडाक्याच्या थंडीत शेतकरी, कामगारांची मुले उबदार कपड्यांशिवाय का चालत असावेत असा प्रश्न त्यांना माध्यमे विचारत नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यामुळे राहुल गांधी टी शर्टवर चालत आहेत यापेक्षा महत्वाचा मुद्दा शेतकरी , कामगारांची मुले उबदार कपड्यांशिवाय आहेत हा मुख्य मुद्दा असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.