आजीने राहुल गांधी यांच्या कानात काय सांगितलं?

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी 93 वर्षीय आजीसोबत संवाद साधला. यावेळी आजीने राहुल गांधी यांना एक खंत बोलून दाखवली.

Update: 2022-11-17 14:47 GMT

भारत जोडो यात्रेत समाजातील विविध घटकांतील लोक राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत असतात. मात्र भारत जोडो यात्रेत ९३ वर्षांच्या आजीने हजेरी लावली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. यावेळी ९३ वर्षीय आजीने राहुल गांधी यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यावरून चर्चांना उधाण आले होते. मात्र त्या आजीने राहुल गांधी यांना काय सांगितलं ते समोर आलं आहे. 

लीना चितळे नावाच्या ९३ वर्षीय आजीने राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठींबा देत सहभाग नोंदवला. या आजी स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांनी भारत जोडो यात्रेच्या ७१ व्या दिवशी वडगाव ते पातूर दरम्यान पायी प्रवास केला. दरम्यान राहुल गांधी यांनी आजीसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना आजी म्हणाल्या की, आज देशाची जी परस्थितीत आहे त्यामुळे मी निराश होत आहे. मी काय बोलायचं काय नाही, हे सरकार ठरवत असत. जर कोणत्या मंत्र्यांनी भाजप विरोधात भूमिका मांडली तर त्यांच्यामागे इडी लावली जाते. मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक दिवस तुरूंगात गेले आहे. आज नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसच्या तरुण पिढीकडून मला खुप अपेक्षा आहेत. देशाबद्दल आजींचे म्हणणं ऐकल्यानंतर राहुल गांधी खुप भावूक झाले. तसेच नागपूर येथून अकोला जिल्ह्यात या यात्रेसाठी मी आली आहे. आजींच्या या यात्रेबद्दल निष्ठा पाहून काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा कौतुक केले.

Tags:    

Similar News