महाराष्ट्रात बेरोजगारांना दीड लाख रोजगार मिळणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेरोजगारांच्या प्रश्नांवर दीड लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यांतरीच्या काळावधीत महाराष्ट्रातील काही प्रकल्पे गुजरात मध्ये गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये नाराजी पाहायाला मिळत होती.वाढीत बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात हिंदुजा ग्रुप एकूण १२ क्षेत्रात ३५ हजार कोटींची गुतवणूक करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे अनेक बेरोजगारांना दीड लाख नोकरीत संधी मिळणार असल्याने मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर जी.पी.हिंदुजा यांनी आभार मानले आहेत.
उद्योगपती हिंदुजा म्हणाले महाराष्ट्रात ३५ हजार कोटी कमीत कमी गुंतवणूक करत आहोत काही कायद्याच्या अडचणीत असल्याने यापेक्षा जास्च गुंतवणूक करु शकत नाही. यापूर्वीची जे मुख्यमंत्री होऊन गेले आहेत त्यांनी आमच्या प्रकल्पाला कधीच मुंजूरी दिली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खुपच वेगळे आहेत त्यांनी आमच्या प्रस्तावाला त्वरीत मंजूरी देऊन प्रकल्पाच्या गुंतवणूकीला सकारात्मक निर्णय दिला.
महाराष्ट्रात मुंबई आणि भंडारा येथे आरोग्याच्या बाबतीत गुंतवणूक करत असल्याने त्यामुळे सरकारला देखील त्याच्या फायदा होणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना दीड लाखांपेक्षा अधिक रोजगार मिळणार आहेत.
करारात कोणते निर्णय घेण्यात आले आहेत. हिंदुजा ग्रुप प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, सायबर, नवीन तंत्रज्ञान, रिअल इस्टेट, या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी ३५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहीती हिंदुजा ग्रुपचे मुख्य जी.पी.हिंदुजा यांनी दिली. गेल्या महिन्यात लंडनमध्ये सेमिनार भरवण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी हिंदुजा ग्रुपला साहाय्य करु असे आश्वासन दिले होते.