दिल्लीतील गुजरातचे नेते देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत का?
अखेर फडणवीसांनी बोलून दाखवलं..., दिल्लीचे नेते फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून का प्रयत्न करत नाहीत. वाचा;
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच लोकसत्ताचे संपादक गिरिश कुबेर यांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा 10 टकक्यांनी गुंतवणूक वाढली असल्याचा दावा करत ते मुख्यमंत्री असताना आपण गुजरातच्या पुढे असल्याचं म्हटलं आहे. यावर गिरिश कुबेर यांनी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेल्यामुळं दिल्लीने पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न केले नाहीत का? असा सवाल केला आहे. यावर फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत उत्तर दिलं आहे.
ते म्हणाले...
ज्या वेळी मी 5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो. 5 वर्षात पहिलं वर्ष वगळता आम्ही गुजरातच्या पुढं गेलो. गुंतवणूकीमध्ये गुजरातला इतकं मागे टाकलं की, गुजरात सहीत तीन प्रमुख राज्यात जेवढी गुंतवणूक व्हायची त्यापेक्षा जास्त आम्ही राज्यात आणत होतो. आता जे सरकार आलेलं आहे. त्यानंतर गुजरात आपल्या 10 टक्के पुढं गेलं आहे. असल्याचं दावा फडणवीस यांनी यावेळी केला.
फडणवीस म्हणाले
कोणीच काही बोलत नाही. आमच्या काळात कोणीही प्रवक्ता उठून सांगायचा हे गुजरातसाठी असं करत आहेत. किती अकांडतांडव करायचे सगळे लोक… आता कोणी काही म्हणत नाही. 10 टक्क्याने गुजरात पुढं गेलं. कोणी त्याच्यावर प्रश्न विचारायला तयार नाही. माझं अगदी स्पष्ट मत आहे. आणि मी पुन्हा मी सांगतो. काही मत मांडली पाहिजे म्हणून मांडतो.
माझा तुमच्या माध्यमांबाबत कुठलाही रोष वैगरे नाही. पण मला असं वाटतं की हे सरकार चाललं पाहिजे. ही जबाबदारी आपलीच आहे. जेवढी टीका तुम्ही आमची करायचा त्याच्या 5 पट देखील टीका तुम्ही यांची करत नाही.
आमचा अजेंडा ठरलेलाच आहे. सत्ता पक्षात असो की विरोधी पक्षात असो आम्ही आमच्या अजेंड्यावर काम करतो. आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पडणं. हे आमच्या अजेंड्याचं बाय प्रॉडक्ट आहे. मेन प्रॉडक्ट नाही.
यावर गिरिश कुबेर यांनी तुम्ही गुजरातच्या पुढे महाराष्ट्राला नेलं म्हणून दिल्लीने तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत म्हणून प्रयत्न केले नाहीत. असं काही झालं नाही ना? असा सवाल गिरिश कुबेर यांनी फडणवीस यांनी केला असता यावर फडणवीस यांनी मजेशीर उत्तर दिलं
ते म्हणाले मला असं वाटतं इथल्या तीन पक्षांना वाटलं पुन्हा हा जर मुख्यमंत्री झाला तर आपल्याकडे बोलायला मुद्देच उरणार नाही. म्हणून हे तीघं लोक माझ्या विरोधात एक आले आहेत.
असं म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली... पाहा काय म्हटलंय फडणवीस यांनी?