#RepublicDay : केंद्राच्या 'शेंडी' संस्कृतीला तामिळनाडूचे चोख उत्तर

Update: 2022-01-26 07:28 GMT

देशाचा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा होत आहे. राजपथावर लष्करी सामर्थ्याचे दर्शन आपल्या सैन्यदलांनी घडवले. तर त्यानंतर विविध राज्यांच्या चित्ररथांनी देशातील एकात्मतेचा संदेश देणारे देखावे सादर केले. पण यावेळी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचे चित्ररथ आधीच नाकारण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी विरोध केला होता आणि पंतप्रधान मोदींनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी केली होती. पण त्यांच्या मागणीची दखल न घेतली गेल्याने स्टालिन यांनी तामिळनाडूमधील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात केंद्राने नाकारलेले चित्ररथ उतरवण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे ध्वजारोहणानंतर हे चित्ररथ रस्त्यावर उतरले.

तामिळनाडूच्या चित्ररथांमध्ये काय?


तामिळनाडू सरकारने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तामिळनाडूमधील लोकांनी दिलेले योगदान, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीची सुरूवात करणारे वीर आणि देशातील सामाजिक परिवर्तनाची सुरूवात करणाऱ्या महान व्यक्तींवर आधारीत एकूण चित्ररथ तयार केले होते. यापैकी पहिल्या चित्ररथांमध्ये इंग्रजांविरोधात सैनिकांनी १८०६मध्ये वेल्लोर येथे केलेल्या बंडाचा देखावा तयार करण्यात आला होता. इंग्रजांविरोधात भारतातील ते पहिले बंड होते. तर दुसऱ्या देखाव्यात ब्रिटीशांविरोधात लढणारी राणी वेलू नचियार यांचा देखावा करण्यात आला होता. त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या महान व्यक्तींचे देखावे होते. तर दुसऱ्या चित्ररथामध्ये स्वातंत्र्यलढ्यासह सामाजिक सुधारणांसाठी संघर्ष कऱणाऱ्या महाकवी भारतीयार यांचा देखावा करण्यात आला होता. त्याचबरोबर आणखी एका चित्ररथामध्ये सामाजिक जातीभेदाविरोधात संघर्ष करुन समाजसुधारणा करणाऱ्या पेरीयार यांचा देखावा साकारण्यात आला होता.

पण तिकडे दिल्लीमध्ये राजपथावर सादर करण्यात आलेल्या चित्ररथांमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या चित्ररथामध्ये वेदांपासून ते मेटाव्हर्सपर्यंत या विषयावर आधारीत देखावा सादर करण्यात आला. यामध्ये काही विद्यार्थी रथाच्या अवतीभवती नाचतानाचे दृश्य होते, त्यातील एका विद्यार्थ्याने भगवा कुर्ता, पांढरी धोती, टक्कल आणि शेंडी तसेच हातात रुद्राक्षाची माळ असा वेष केला होता. यामधून शिक्षण मंत्रालयाला कोणता संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडताना, "बहुजनांची मुलं मुली शिकून #Metaverse ला निघून जातील, योग्य शिक्षण घेतलं नाही तर शेंडी ठेवून नाचावं लागेल. शिक्षण मंत्रालयाच्या चित्ररथाला आंबेडकर-पेरियार हेच उत्तर आहे" असे मत व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News