राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्यामुळे केंद्रातील भाजप सरकार प्रत्येक राज्याच्या योजनेला रेड सिग्लन लावत असल्याचे दिसत आहे. आरे कारशेड, धारावी पुर्नविकासाबरोबरच आता बीडीडी चाळीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, याचे कारण शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना केंद्रातील खासदारांनी लिहिलेलं पत्र. यापत्राद्वारे इमारत पुनरबांधणीची कोणतीच योजना नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे वरळी, नायगाव आणि डिलाईल रोड येथील बीडीडी चाळीचे पुर्नबांधकाम होत असताना, शिवडी येथील 15 बीडीडी चाळीतील रहिवाश्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न मात्र टांगणीला आहे. यासंदर्भात गेली 8/10 वर्ष संघर्ष करणारे काँग्रेसचे जेष्ठ नेते राजू वाघमारे यांच्यासोबतआमचे प्रतिनिधी किरण सोनावणे यांनी साधलेला संवाद...
बीडीडी-चाळींच्या विकासाला केंद्रांचा विरोध कशासाठी? https://t.co/uLWtgrqZV2
— Max Maharashtra (@MaxMaharashtra) June 16, 2022