40 लाख टन कांदा असताना 2 लाख टनाची खरेदी का? अजित नवले यांचा संतप्त सवाल
केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रीया उमटत होत्या. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे कृषी मंत्री दिल्ली दौऱ्यावर पियुष गोयल यांची भेट घेण्यासाठी गेले असतानाच जपानमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख टन कांदा नाफेड मार्फत खरेदी करण्याची घोषणा केली. ही एक प्रकारे धनंजय मुंडे यांना श्रेय जाऊ नये म्हणून भाजपकडून केली जाणारी कुरघोडी असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र सध्या राज्यात नेमका किती कांदा आहे? सरकारची घोषणा कशी आहे? याविषयी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी आपली भूमिका मांडली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत अजित नवले? जाणून घेण्यासाठी पाहा...