अर्णब गोस्वामीचं कोर्ट मार्शल करा: संजय राऊत

अर्नबगेट प्रकरणावरुन पाकिस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रश्न उपस्थित केला असताना भाजप अंग काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेना खा. संजय राऊत यांनी अर्नब गोस्वामीचं कोर्ट मार्शल करण्याची मागणी केली आहे.;

Update: 2021-01-18 07:47 GMT

रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांचे व्हाट्सअप चॅट उघडकीस आले आहेत. त्यातून त्यांना पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचं आधीच माहीत असल्याचं दिसून येतं. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे त्यांचं कोर्ट मार्शल झालं पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.

अर्णव गोस्वामी यांच्या संदर्भात भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बोलायला पाहिजे. इतर वेळी भाजप नेते देशातील सर्वच पक्षांबद्दल बोलत असतात. आता या प्रकरणावर त्यांनी बोललं पाहिजे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

देशाच्या सुरक्षेविषयची माहिती बाहेर येत असेल तर हा राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धक्का आहे. गोस्वामी जणू काही राष्ट्रीय सल्लागार असल्याच्या थाटातच हे चॅट बाहेर आले आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी त्यावर भूमिका मांडायला हवी. भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी भूमिका मांडली तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या ज्ञानात भर पडेल, असा टोला त्यांनी लगावला.

Full View


Tags:    

Similar News