ट्विटरवर सध्या #ANUPYOGI ट्रेंडींगमध्ये आहे. सध्या उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच निवडणुकांसंदर्भात हा शब्द आता ट्रेंडिंगमध्ये आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीमध्ये दोन दिवस मुक्काम केला होता. त्यानंतर शनिवारी गंगा एक्स्प्रेस वेच्या उद्घाटनावेळी योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतकुचा वर्षाव करत मोदींनी योगी हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असे स्पष्ट केले आहे. पण आता मोदींच्या या उपयोगी वक्तव्यावरुन उ.प्रदेशात राजकारण तापले आहे.
समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ हे उपयोगी नाही अनुपयोगी आहेत, असा टोला लगावला आहे. अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे, "हाथरस की बेटी, लखीमपुर का किसान, गोरखपुर का व्यापारी, असुरक्षित महिला, बेरोज़गार युवा, पीड़ित दलित-पिछड़े सब कह रहे हैं… यूपी के लिए वर्तमान सरकार उपयोगी नहीं, अनुपयोगी है। यूपीवाले कह रहे हैं अगर कोई 'उप-योगी' है; तो 'मुख्य-योगी' कौन है। यूपी कहे आज का नहीं चाहिए भाजपा" या शब्दात त्यांनी टीका केली आहे.
दुसरीकडे काँग्रेसनेदेखील पंतप्रधान मोदींच्या या दाव्याची खिल्ली उडवत ट्विट केले आहे. Amit + Narendra + UP+ Yogi = Anupayogi असे ट्विट केले आहे.