अदानी समुहावर ही वेळ का आली?
अदानी समुहाचे शेअर्स कोसळले. मात्र, हे सर्व अचानक झालं आहे का? यामागे पडद्यामागे काही घडामोडी घडल्या आहेत का? पाहा विश्वास उटगी यांचं विश्लेषण
अदानी समुहाचे शेअर्स जवळ जवळ 25 टक्क्याने घसरले आहेत. अदानी समुहाला यामुळे अब्जावधी रुपयांचा फटका बसला आहे. मात्र, देशातील 2 नंबर श्रीमंत असलेल्या अदानी समुहाला अचानक इतका मोठा फटका का बसला? असा सवाल उपस्थित होते आहे.
गौतम अदानी समुहाचे शेअर्स का कोसळले असा सवाल आता सर्वसामान्य लोकांना देखील पडला आहे. गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये यामुळे किती घट होईल? हर्षद मेहता स्कॅम प्रमाणे हा मोठा घोटाळा आहे का? अदानीचे शेअर्स कोसळल्याने शेअर मार्केटवर काय परिणाम होणार? या सर्व प्रकरणांमध्ये सेबीची भूमिका संशयास्पद वाटते का? असे सवाल लोक आता उपस्थित करत आहेत. लोकांच्या या प्रश्नांची बॅकींग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी दिलेली उत्तर नक्की पाहा...