कोण आहेत सचिन वाझे?

गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे हे नाव कायम चर्चेत राहिलं आहे. सचिन वाझे हे नाव चर्चेत येण्याची पहिलीच वेळ नाही... सचिन वाझे यांचं नाव या अगोदरही चर्चेत आलं आहे... वाचा कोण आहे सचिन वाझे;

Update: 2021-03-14 04:12 GMT

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मुंबईत 25 फेब्रुवारीला एका स्कॉर्पियोत स्फोटक सापडली होती. या स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेन याचा त्यानंतर मृतदेह खाडीत आढळला होता. मनसुख हिरेन याची हत्या तपास अधिकारी सचिन वाझे यांनी केल्याचा आरोप मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केला आहे.

या आरोपानंतर एनआयएकडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर शनिवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी त्यांना NIA ने अटक करण्यात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सचिन वाझे माध्यमांमध्ये चांगलेच चर्चेत आहेत. कोण आहेत सचिन वाझे?

कोण आहेत सचिन वाझे?

सचिन वाझे हे असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर म्हणून सध्या कार्यरत आहेत. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे मुख्य आहेत. जून २०२० मध्ये वाझे यांचे निलंबन मागे घेण्यात येऊन त्यांना सेवेत रुजू करुन घेण्यात आले होते. १९९०च्या दशकात वाझे यांची ठाण्यात बदली झाली. तेव्हा मुंबईत माफियांचा धुमाकूळ सुरू होता. वाझे यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या हाताखाली काम केले. सचिन वाझे यांनी आतापर्यंत अनेक गुंडांचे एन्काऊंटर केले आहे. पण २००२मध्ये मुंबईतील एका बॉस्बस्फोटाची चौकशी करत असताना ख्वाजा युनूस याला ताब्यात घेण्यात आले होते. पण या ख्वाजा युनूसचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याचा आरोप झाला आणि काही अधिकाऱ्यांवर याप्रकरणात गुन्हा दाखल झाला त्यात सचिन वाझे हे सुद्धा होते. त्यानंतर याच प्रकरणा त्यांनी २००४मध्ये निलंबित करण्यात आले. त्यानंतर काही वर्षांनी सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

त्यानंतर महाविकास आघाडीचे राज्यात सरकार स्थापन झाल्यावर सचिन वाझे यांचे निलंबन रद्द झाले आणि त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक करणाऱ्या पोलिसांच्या टीमचे नेतृत्व वाझे यांनीच केले. तर अर्णब गोस्वामींना अडचणीत आणणाऱ्या टीआरपी घोटाळ्याची चौकशी देखील सचिन वाझे यांच्याकडेच आहे.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक आढळली होती. ही स्फोटक ठेवण्यासाठी वापरलेली गाडी ही मनसुख हिरेन यांची होती. या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. या संदर्भात मनसुख हिरे यांच्या पत्नीने संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा. अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा. असा माझा संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.

विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता.

या गोंधळामुळे काल 9 मार्च विधानसभेचे कामकाज नऊ वेळा तहकूब झाले होते. त्यानंतर मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असणाऱ्या सचिन वाझे यांची CFC विभागात बदली करण्यात आली होती.

त्यानंतर एनआयए ने चौकशी नंतर सचिन वाझेला अटक केली आहे.

जगाला गुड बाय करण्याची वेळ आली: सचिन वाझे

अंबानीच्या घराबाहेर स्फोटक भरलेली कार आढळल्यानंतर चर्चेत आलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी ठेवलेल्या स्टेटसमुळं मोठी खळबळ उडाली होती0. सचिन वाझे यांनी आपल्या व्हाट्सअपला स्टेटस ठेवलं होतं. या स्टेटसमध्ये

"3 मार्च 2004 रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. ती केस अजूनही अनिर्णित आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली."

असं स्टेटस मध्ये म्हटलं होतं.

Tags:    

Similar News