भाजपचे नगरसेवक शिवसेनेने फोडले की खडसेंनी? श्रेयवादाची लढाई सुरु...
भाजपचे नगरसेवक शिवसेनेने फोडले की खडसेंनी? श्रेयवादाची लढाई सुरु...
जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. सत्ताधारी भाजपचे 57 पैकी तब्बल 25 हून अधिक नगरसेवक शिवसेना नेत्यांबरोबर सहलीला रवाना झाले आहेत. मात्र, भाजपचे हे नगरसेवक शिवसेनेने फोडले की खडसेंनी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
या संदर्भात माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचा महापौर होणार आणि फुटीर भाजप नगरसेवकांमधून उपमहापौर कोण करायचा? याचा निर्णय आपण घेणार असल्याचं म्हटलं आहे.
मात्र, या नगरसेवकांमध्ये एकच नगरसेवक खडसे समर्थक असल्याचं समजतंय. सदर नगरसेवकाचे नाव सुनिल खडके असं आहे. गिरिश महाजन यांनी खडके यांना उपमहापौर केलं होतं. मात्र, ते शिवसेनेला जाऊन मिळाले आहेत. या सर्व नगरसेवकांनी खडसे यांची भेट घेतली. असा दावा खडसे करतात.
तर दुसरीकडे सर्व भाजप फुटीर नगरसेवकांनी शिवसेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर पुढील नियोजन ठरवण्यात आल्याचं समजतंय. तसंच या भेटीनंतरच हे सर्व फुटीर नगरसेवक सहलीला नेल्याचं बोललं जातंय.
त्यामुळं भाजपचे ते नगरसेवक नक्की खडसेंनी फोडले की शिवसेनेने असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक 18 मार्चला होणार आहे. त्या अगोदरच महापालिकेत राजकीय भूकंप झाला आहे.Gulab Rao