विरोधी पक्ष अमित शहा यांचा राजीनामा कधी मागणार? दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेवरून नागेश केसरी यांचा सवाल
गेल्या काही दिवसांपुर्वी दिल्लीत एका अल्पवयीन मुलीला जीवे मारल्याची घटना घडली. त्याआधीही दिल्लीत मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे दिल्लीच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र विरोधी पक्षात असताना निर्भया प्रकरणावरून रान पेटवणाऱ्या भाजपने यावर चुप्पी साधली आहे. मात्र विरोधी पक्ष काँग्रेसही या प्रकरणी तोंडावर बोट ठेऊन आहे. यावरून ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी यांनी सवाल उपस्थित केला आहे.