प्रत्येक वर्षी जून महिन्यात मुलांचं शैक्षणिक वर्ष सुरु होतं. मात्र, कोरोनाच्या महामारीने मुलांचं शिक्षण थांबलं. आधेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर शाळा सुरु करण्याच्या गप्पा सरकार मारताना दिसतं.
यंदाही कोरोना परिस्थिती आटोक्यात येताना दिसत असली, तरी प्रत्येक शाळा अद्यापपर्यंत सुरु झालेल्या नाही. त्यामुळे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांची सुरुवात देखील ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागणार आहे. याबाबत शिक्षण विभागाने एक पत्र काढले आहे, नेमकं काय आहे या पत्रात पाहू या...