मा. गृहमंत्री अनिल देशमुख ईडी समोर कधी जाणार? अनिल देशमुख म्हणाले...
ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी कधी हजर होणार? असा प्रश्न उपस्थित होत असताना देशमुख यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून आपण ईडीसमोर कधी हजर होणार याबाबत जाहीर केले आहे.
मुंबई : ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या चौकशीसाठी थेट हजर न राहता वकिलांमार्फत हजर राहत आहेत. अशावेळी अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी कधी हजर होणार? असा सवाल उपस्थित होत असताना त्यांनी स्वतःहून एक प्रसिद्धीपत्रक काढत आपण ईडी समोर कधी हजर होणार याबाबत जाहीर केले आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार अनिल देशमुख यांनी, 'माझी ईडीच्या बाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकून घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा सुद्धा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वतः ED च्या समोर जाणार आहे व त्यांना सहकार्य करणार आहे, असे म्हटले आहे.