Tesla 'भारतात 'टेस्ला' कार कधी येणार`? :इलॉन मस्कने ट्विट करुन दिले उत्तर

Update: 2022-05-28 10:48 GMT

वीजेवर चालणारी जगप्रसिध्द कार टेस्ला (Tesla) भारतीयांना कधी मिळणार? अशी उत्सुकता असताना जोपर्यंत भारत टेस्लाने बनवलेल्या कार विकण्याची भारतात परवानगी देत नाही तोपर्यंत टेस्ला नव्या कार बनवणार नसल्याचे स्पष्टीकरण इलॉन मस्क (Elon musk)यांनी ट्विट करुन सांगितलं आहे.

गेली काही दिवस भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार आणण्यासाठी टेस्लाकडून प्रयत्न सुरु आहेत. आता भारतीय बाजारपेठेत टेस्ला कार आणण्याचा निर्णयाला इलॉन मस्क यांनी स्थगिती दिल्याचे खुद्द ट्विट करुन सांगितले आहे. जोपर्यंत भारत टेस्लाने बनवलेल्या कार विकण्याची भारतात परवानगी देत नाही तोपर्यंत टेस्ला नव्या कार बनवणार नसल्याचे मस्क यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.


परवानगी देण्याआधी भारत सरकारने टेस्लासमोर अट ठेवली आहे. केवळ भारतात तयार केलेल्या इलेक्ट्रिक कार टेस्ला भारतात विकू शकते अशी अट भारत सरकारने टेस्ला कंपनीसमोर ठेवली आहे. तसेच आधी चीनमध्ये तयार केलेल्या कार भारतात विकून टेस्लाला भारतीय बाजारपेठेचा अंदाज घ्यायचा होता. या गोष्टीवरुन हा प्रस्ताव बराच काळापासून रखडला आहे.

टेस्लाला भारतात कारखाना सुरू करण्यापूर्वी त्यांनी उत्पादित केलेल्या इलेक्ट्रिक कार भारतात आणण्यावर आयात करात सूटीची मागणी केली होती. त्यामुळे टेस्लाला भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या कारची मागणी तपासता येईल. मात्र टेस्लाला भारतात कार विकण्याअगोदर भारतात कारखाना सुरु करावा लागेल आणि भारतातच तयार केलेल्या कार विकता येईल अशी अट भारत सरकारने टेस्लासमोर ठेवली आहे. त्यामुळे चीनमध्ये बनवलेल्या टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात विकता येणार नाही, असं भारताकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलं आहे.

Tags:    

Similar News