भाजपच्या नाचे मंडळींना गाय दूध देते हे दिसत नाही, तर फक्त शेण दिसते. खरेतर आता गाईच्या शेणातूनही अनेक 'उपचार' पद्धती सुरू झाल्या आहेत व शेणापासून इतर अनेक उपयुक्त उपक्रम संघ परिवाराच्याच गोशाळेत सुरू केले आहेत, या टोणग्यांना हे समजणार कधी ? असा परखड सवाल आज सामना संपादकीय मधून उपस्थित करण्यात आला आहे.
गेली काही दिवस भाजप नेत्यांकडून कोविड निर्बंधांबाबत विविध प्रतिक्रिया येत आहेत. या टीकेचा खरपूस समाचार आज सामना संपादकीय मधून घेण्यात आला आहे. अमेरिकेसारख्या देशात कोरोनाचा विस्फोट होत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती नियंत्रणाखाली आहे. गंगेतील वाहत्या प्रवाहात कोरोनाग्रस्तांचे मृतदेह वाहताना जगाने पाहिले. गुजरातसारख्या राज्यात स्मशानात दोन दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या होत्या. मुंबई - महाराष्ट्राने शर्थ करून असे विदारक चित्र घडू दिले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविडची लढाई राज्यांनी पुढे न्यावी. देशाला लाभलेले सध्याचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवियाही उत्तम काम करीत आहेत. निदान मुंबईतील भाजपच्या नाच्यांनी त्यांना तरी अपशकून करू नये, असं सामानानं म्हटलं आहे.
हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी यांनी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. निर्बंधांबाबत काटेकोर राहावे असे त्यांनी सरकारी यंत्रणांना सुचवले, पण याची सुरुवात पंतप्रधानांनी स्वतःपासूनच केली पाहिजे. वेगवान लसीकरणावर जोर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या कोविड बेफिकीरीवर बोलताना सामना संपादकीय ने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर ही टीका केली आहे. मधल्या काळात शंभर कोटी लोकांना लस देण्याचा जो उत्सव साजरा झाला तो नक्की काय होता? सरकारी यंत्रणांवर आज प्रचंड ताण आहे. त्यात कोणाशीही चर्चा न करता पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत.निवडणुकांचा मोसम हा कोरोना वेगाने वाढविण्याचा कारखानाच ठरतो. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांबाबत म्हणूनच चिंता वाटते. महाराष्ट्रासारख्या राज्यात चारशेहून जास्त डॉक्टर कोरोनाग्रस्त झाले आहेत. हजारो पोलीस बेजार आहेत. मुंबईत रोज 20,000 लोकांना कोरोना होतोय.
राज्यातला आकडा दुप्पट आहे. "झपाटय़ाने पसरणाऱ्या ओमायक्रोनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कायम सतर्क राहणे गरजेचे असून मास्कचा योग्य वापर व सामाजिक अंतर राखणे या गोष्टी आता आपल्या जगण्याचा एक भाग व्हायला हव्यात." मोदी यांनी एकदम योग्य तेच सांगितले, पण हे सर्व तुमच्यापासून सुरू व्हायला हवे. पुतीनपासून बायडेनपर्यंत अनेक जागतिक नेत्यांसोबतच्या बैठकीत हे सर्व नेते 'मास्क' लावूनच बसलेले दिसतात. एकमेव अपवाद फक्त आमच्या पंतप्रधानांचा.
यापुढे आपल्याला कोरोनासोबत जगावे लागेल, असे भाकीत दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेच होते. कोरोनाशी लढाई हा वादाचा व मतभेदाचा विषय असू नये. केंद्र सरकार याबाबतीत ज्या उपाययोजना करू पाहत आहे त्यास राज्य सरकारांनी हातभार लावायला हवा.
केंद्र सरकारच्या उपाययोजनांत भ्रष्टाचार सुरू आहे, घोटाळे आहेत, असे आरोप महाराष्ट्रातून कोणी केले नाहीत. राजकारण करायचेच तर ते कोठेही करता येईल, पण महाराष्ट्राची ती नियत नाही. मुंबई - महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करीत आहे. मुंबईत अद्ययावत कोविड सेंटर्स उभारून लोकांना सेवा दिली जात आहे, असं सामनानं म्हटलं आहे.लोकांचे प्राण वाचविले जात आहेत. यावरही भाजपच्या काही नाचे मंडळींचा त्यावर आक्षेप असून ते जमिनीवर काठय़ा आपटून 'साप साप' म्हणून बोंबलत फिरत आहेत.
या नाचे मंडळींना नवाब मलिक यांनी कडक उत्तर दिले आहे. या नाचे मंडळींना गाय दूध देते हे दिसत नाही, तर फक्त शेण दिसते. खरेतर आता गाईच्या शेणातूनही अनेक 'उपचार' पद्धती सुरू झाल्या आहेत व शेणापासून इतर अनेक उपयुक्त उपक्रम संघ परिवाराच्याच गोशाळेत सुरू केले आहेत, या टोणग्यांना हे समजणार कधी? समाजाला लागलेली ही कीड आहे. चांगले चाललेले बघवले न जाण्याची पोटदुखी आहे. मुंबई महाराष्ट्रात जे कार्य कोरोना महामारीशी लढण्याबाबत सुरू आहे ते देशात पहिल्या क्रमांकाचे आहे. तेव्हा उगाच जळफळाट करून खुसपटे काढण्यापेक्षा या सत्कार्याला हातभार लावून लोकांची सेवा करा. तेवढेच पुण्य पदरी पडेल, जे चांगले पण सुरू आहे त्यावर चिखलफेक करायची, यापेक्षा वेगळे उद्योग त्यांचे दिसत नाहीत.
अमेरिकेसारख्या देशात कोरोनाचा विस्फोट होत आहे. आतापर्यंत तब्बल सहा कोटी नागरिक कोरोनाबाधित झाले असून आठ लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती नियंत्रणाखाली आहे. गंगेतील वाहत्या प्रवाहात कोरोनाग्रस्तांचे मृतदेह वाहताना जगाने पाहिले. गुजरातसारख्या राज्यात स्मशानात दोन दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या होत्या. मुंबई - महाराष्ट्राने शर्थ करून असे विदारक चित्र घडू दिले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविडची लढाई राज्यांनी पुढे न्यावी. देशाला लाभलेले सध्याचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवियाही उत्तम काम करीत आहेत. निदान मुंबईतील भाजपच्या नाच्यांनी त्यांना तरी अपशकून करू नये, असा शेवटी सामना संपादकीय मधून इशारा देण्यात आला आहे.