5-जी कधी सुरु होणार, केंद्र सरकारची महत्वाची माहिती...

5-जी कधी सुरु होणार, केंद्र सरकारची महत्वाची माहिती...;

Update: 2022-03-26 02:14 GMT


देशात 5 जी सुरु होणार असल्याच्या चर्चा तुम्ही सतत ऐकत असतात. मात्र, या संदर्भात केंद्र सरकारने आज राज्यसभेत माहिती दिली. केंद्र सरकारने 2022 साली, 5-जी स्पेक्ट्रम चे लिलाव करण्याचे नियोजन केले आज राज्यसभेत दिली आहे.

दूरसंचार सेवा प्रदाते (TSPs) दिल्ली, मुंबई, जामनगर, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरु, लखनौ, गुडगाव, गांधीनगर, चंडीगढ, पुणे आणि वाराणसी अशा शहरांसह, शहरी, उपनगरी आणि ग्रामीण भागात 5जी च्या चाचण्या घेत आहेत. देशभरातील विविध शहरांमध्ये व्यवसायिक/नेटवर्क 5-जी योजना सुरु करण्यासाठी, या चाचण्या सुरु आहेत.

केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंग चौहान यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.

गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, अवकाश विभाग अशा सर्व विभागांच्या सचिवांच्या समितीने स्पेक्ट्रम वाटपासंदर्भात हे तंत्रज्ञान वापरणारी विविध मंत्रालये/विभाग यांच्याशी चर्चा केली असल्याचं चव्हाण यांनी सांगितले. उदयोन्मुख तंत्रज्ञान/वापर (5जी/आयएमटी) आणि विविध महत्वाच्या बॅन्ड स्पेक्ट्रम वितरण शिफारशीविषयी चर्चा करण्यात आली आहे.

या सगळ्या चर्चेनुसार, दूरसंवाद विभागाने, दूरसंचार नियामक संस्था -ट्राय कडे 13-09-2021 कडे संदर्भ पाठवले असून, आंतरराष्ट्रीय मोबाईल दूरसंचार (IMT)/5G साठी फ्रिक्वेन्सी बॅन्ड साठी शिफारसी करण्यात आल्या असल्याचं चौहान यांनी राज्यसभेत सांगितलं.

Tags:    

Similar News