Mark Zuckerberg चा मोठा निर्णय, एकाच वेळी चार फोनमध्ये वापरता येणार WhatsApp
WhatsApp : जगभरात मेसेजिंगसाठी प्रसिध्द असलेल्या व्हॉट्सअपने एकाच वेळी अनेक फोनमध्ये तुमचं अकाऊंट सुरू ठेवण्याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे.;
Whatsapp चे जगभरात 2.24 billion वापरकर्ते आहेत. त्यामुळे व्हॉट्सअप आपल्या वापरकर्त्यांसाठी ग्राहकांसाठी अनेक भन्नाट फिचर्स घेऊन येत असतं. त्यातच आता व्हॉट्सअपने एकाच वेळी चार फोनवर Whatsapp वर लिंक करता येणार असल्याचं जाहीर केलं आहे.
यासंदर्भात व्हॉट्सअपचे CEO मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर माहिती दिली. यामध्ये मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे की, आजपासून तुम्ही चार फोनमध्ये व्हॉट्सअप वापरू शकता.
हे मागील काळामध्ये असलेली मर्यादा मोडता येणार आहे. मागील काळात व्हॉट्सअपमध्ये बदल करण्यात आले होते. त्यावेळी चार डेस्कटॉपवर व्हॉट्सअप लिंक करता येत होते. मात्र आता चार फोनमध्ये हे व्हॉट्सअप चालवता येणार आहे.