करमणुकीसाठी साहित्य प्रसवण्याचे दिवस इतिहासजमा झाले - मनोज भोयर
करमणुकीसाठी साहित्य प्रसवण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत.स्वतःच्या कोशात राहून केलेली साहित्याची निर्मिती बहुजनांना आता आपल्या कवेत कधीही घेऊ शकत नाही.त्यांच्या मनाला उभारीही देऊ शकत नाही.त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करू शकत नाही.असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि मॅक्स महाराष्ट्र चॅनलचे संपादक मनोज भोयर यांनी सिंगापूर इथे व्यक्त केलं. शब्द परिवारातर्फे सिंगापूर इथे नववे मराठी विश्व मराठी साहित्य संमेलन १४ ते १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. सुप्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ समाजसेविका रजिया सुलताना या संमेलनाध्यक्ष होत्या तर ज्येष्ठ पत्रकार आणि मॅक्स महाराष्ट्र चॅनलचे संपादक मनोज भोयर यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले.