महायुतीमध्ये राहून सुद्धा प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडत असतात आणि दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाल्याचं श्रेय ते आवर्जून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देतात.आता ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी बच्चू कडू काही मागण्यांसाठी संभाजीनगर इथे मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा नेमका कशासाठी? आणि महायुतीत असूनदेखील त्यांना मोर्चा का काढावा लागतोय? यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी बच्चू कडू यांची घेतलेली खास मुलाखत...