राज्यपाल नियुक्त 'त्या' बारा आमदारांचे काय होणार?
दुसरी वर्षापुर्ती करण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेले बारा आमदार आता तरी निवडले जातील अशी शक्यता निर्माण झाली असून आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.;
भाजप आणि शिवसेना मध्ये सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेला त्या बारा आमदार बाबत उच्च न्यायालयामध्ये आणि केंद्राच्या पातळीवर देखील विचारणा झाली आहे. मागील आठवड्यात राजभवन कडून याबाबत विधी व न्याय विभागाचे देखील मत जाणून घेण्यात आली आहेत. माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ची माहिती विचारल्यानंतर सदर माहिती राजभवन मध्ये उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले होते त्यावर आज राज भवन मध्ये त्यावर अपिलाची सुनावणी देखील होणार आहे.
शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर (कला), नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांची नावे देण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कडून एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार), राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा), यशपाल भिंगे (साहित्य), आनंद शिंदे (कला) त्यांची नावे असूनकाँग्रेस कडून रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार), सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार), मुझफ्फर हुसेन (समाजसेवा), अनिरुद्ध वनकर (कला) यांची नावे राज्यपालांच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या चार क्षेत्रांशी संबंधित व्यक्तीची वर्णी लागते. या निकषांच्या आधारे महाविकास आघाडीने १२ नावे निश्चित करून राज्यपालांना सादर केली आहे.
कलम 163 (1) अंतर्गत विधानपरिषदेच्या जागांसाठी राज्यपाल नियुक्ती करू शकतात. तर कलम 171 (5) नुसार राज्यपालांना साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या पाच क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करता येते.
आमदाराच्या निवृत्ती वरच महा विकास आघाडी सरकारची पुढची दिशा स्पष्ट होणार असून यामध्ये भाजपधर्जिना निकाल लागतो किंवा महाविकासआघाडी धर्जिना हे पाहणे देखील आता महत्त्वाचे ठरणार आहे.