अर्थसंकल्प 2024 मध्ये कोणत्या तरतुदी होण्याची शक्यता ? जाणून घ्या सविस्तर माहिती
Union Budget 2024 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन ह्या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करीत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचं हे शेवटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. आगामी अर्थसंल्पाची (Budget 2024-25) सगळी तयारी पूर्ण झाली असून हा अर्थसंकल्प लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी सादर होत आहे. त्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा आहे.
कोणत्या तरतूदी या अर्थसंकल्पात सादर होतील ?
ग्रामीण भागातील रस्ते, मनरेगा, पायाभूत सुविधा क्षेत्र, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि पीएम विश्वकर्मा योजना यासारख्या योजनांसाठीच्या तरतूदीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. रोजगार निर्मीतीच्या दृष्टीने उत्पादन आधारीत सवलत योजनेचा (PLI) सरकारकडून विस्तार केला जाऊ शकतो.चालू आर्थिक वर्षात प्राप्ती कर आणि कंपनी कर यांच्या वसूलीत समाधानकारक वाढ होण्याची अपेक्षा आहे, तर सामाजिक सुरक्षेच्या योजनांसाठी भरीव तरतुद केली जाऊ शकते. प्रत्यक्ष करवसुलीचे प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत 1 लाख कोटी रुपयांनी जास्त राहू शकते.
कधी होणार सादर हा अर्थसंकल्प 2024 ?
दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला संसदेच्या अधिवेशनात अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला जातो. नेहमीप्रमाणे याहीवर्षी अंतरीम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. यावर्षी लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत, त्यामूले हा पूर्ण अर्थसंकल्प नाही. ही तात्पुरती आर्थिक योजना किंवा "व्होट ऑन अकाऊंट" आहे, अशी कल्पना अर्थमंत्र्यांनी दिली आहे.उद्या सकाळी ठिक 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. लोकसभा निवडणूकांपूर्वीच हा अर्थसंकल्प सादर केला जात आहे, ही विशेष बाब आहे.