रविकांत तुपकरांचा किन्होळा पॅटर्न, जिल्हाधिकारी म्हणाले संपुर्ण जिल्ह्यात राबवणार

Update: 2021-05-06 13:47 GMT

चिखली तालुक्यातील किन्होळा गावात गावकऱ्यांनी जिल्ह्यातील पहिले 50 बेड चे कोविड आयसोलेशन सेंटर उभारले आहे. लोकसहभागातून सुरु करण्यात आलेल्या या आयसोलेशन सेंटरचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी भरभरून कौतुक केले असून लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटरचा किन्होळा पॅटर्न संपूर्ण जिल्हाभर राबविणार असल्याचा मनोदय जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

किन्होळा गावातील शिवाजी हायस्कूलच्या सुसज्ज इमारतीत हे 50 बेडचे कोरोना आयसोलेशन सेंटर उभारण्या आले असून याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होऊन मनोबल वाढण्यासाठी टीव्ही आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून सकारात्मक माहितीचे प्रसारण केले जाणार आहे.

किन्होळा गावचे प्रतिष्ठित नागरिक प्रभू बाहेकर यांच्या हस्ते आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. सदर आयसोलेशन सेंटरची संकल्पना राबविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस.राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र सांगळे, शासकीय कोविड सेंटरचे प्रभारी डॉ.सचिन वासेकर, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ, सरपंच अर्चना जाधव यांचेसह इतर मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

Tags:    

Similar News